१८/०३/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- म राठा समाजाचे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाजाच्या सुचनेनुसार मराठा समाजाच्या मागण्या पूर्णत्वास गेल्या नाहीत या साठी निवडणूकीच्या माध्यमातून गणिमी काव्याचे अस्त्र म्हणून सदर लोकसभा निवडणुकीत ज्यास्तीत ज्यास्त अर्ज भरले जावेत जेणेकरून निवडणूक अर्जातून निवडणूक आयोग व त्या अंतर्गत शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच अर्ज भरण्याचा निर्णय चळे ता. पंढरपूर येथील रविवार १७ मार्च रोजी महादेव मंदिरातील बैठकीत करण्यात आला.
चळे येथील महादेव मंदिरातील उपस्थित कार्यकर्ते
या वेळी ४२ सोलापूर राखीव मतदारसंघासाठी हरी शिखरे, हरी कांबळे, लखन वाघमारे यांनी मराठा समाजाच्या पाठींब्या साठी इच्छुक म्हणून तयार असल्याचे सांगितले तर ४३ माढा लोकसभा मतदारसंघासाठी प्रदिप मोरे , युवराज गायकवाड यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. ही प्रातिनिधिक स्वरूपातील बैठक निवडणूक विषयी रुपरेषा, आचारसंहिता , या बाबतीत विचार मंथन होवून संपन्न झाली. या पुढील निर्णय मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाजाच्या पुढील आदेशा प्रमाणे घेण्याचे ठरले.
0 Comments