LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उमेदवारीचे मैदान फलटण च्या सिंहाने मारले ; पण् खासदारकी चे मैदान अकलूज चा सिंहच मारणार का..!?

१९/३/२४

लोकपर्व न्यूज नेटवर्क:-  मा ढा लोकसभा मतदारसंघ   अस्तित्वात आल्यापासून वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच महाराष्ट्रसह देशाच्या राजकारणात चर्चेत राहिला आहे.
 कारण  २००९ साली पंढरपूर  राखीव ऐवजी माढा लोकसभा खुला झाला व मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहीला खासदार होण्याचा मान 
खा. शरदचंद्र पवार यांना मिळाला व ते केंद्रीय कृषिमंत्री झाले 
त्या निवडणूकीची धुरा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनी सांभाळली होती
तर २०१४ साली अतिशय कडवा विरोध व मोदी लाट असतिनाही विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी तून निवडणून आले  सदाभाऊ  खोत भाजपकडून  पराभूत झाले  विशेष म्हणजे जिल्ह्यातील त्यावेळीची समविचारी आघाडी मोहिते  पाटील यांच्या विरोधात अतिशय सक्रिय होती त्याचे नेतृत्व आ. संजय शिंदे हेच करत होते) 
२०१९ साली मोहिते पाटीलच भाजपमध्ये दाखल झाले व सोबत त्यावेळी काँग्रेस मध्ये असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपमध्ये आणून माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी चे संजय शिंदे यांच्या विरोधात रणजितसिंह निंबाळकर याना भाजपची उमेदवारी देवून  माळशिरस तालुक्यातून निर्धारित मतदान देत माढ्याचे खासदार बनवण्यासाठी सिंहांचा वाटा उचलला होता.
 परंतु २०२४ च्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे धैर्यशील मोहिते - पाटील यांनी उमेदवारी मागितली होती परंतु भाजपाने  विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा  तिकीट जाहीर केले.त्यामुळे मोहिते पाटील समर्थकातून मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली .
त्याचीच परिणीती अकलूज  मध्ये १७ मार्च च्या शिवरत्न  वरील बैठक मेळाव्यातून दिसून आले.  
उलटपक्षी खा. निंबाळकर यांनी ही पाच आमदारांना आ. संजय शिंदे यांच्या टेंभुर्णी  येथील फार्म हाऊसवर १८ मार्चच्या  बैठक मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन केले. 

  तर लागलीच १९ मार्च रोजी खासदारकी साठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातून डायरेक्ट प्रचारालाच सुरवात केली. 

 त्यामुळे भाजपकडून उमेदवारी चे मैदान फलटण च्या सिंहाने मारले पण् खासदारकी चे मैदान अकलूज चा सिंहच मारणार.. का.!? असे जोराचे विचारांचे विविध  प्रश्नांकित वारे वाहू लागले आहे.  वा-याची स्पष्ट दिशा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर च निश्चित होणार आहे. 
तो पर्यंत लढणे मात्र निश्चित झाले आहे.



 .
         
       


Post a Comment

0 Comments