लोकपर्व न्यूज नेटवर्क :- पंढरपूर तालुक्यातील चळे येथील शेतकऱ्या मधून महावितरणच्या कारभारा बद्दल व मा. जिल्हाधिकारी व शासनाच्या विज कमी पुरवठा व विज खंडीत करण्याच्या धोरणाच्या विरूद्ध तीव्र असंतोष पसरला आहे.
उजनी धरणातून सोलापर शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणी सोडण्यात आले व ते पाणी जलद गतीने पोहचावे व नदीच्या प्रवाहीत पाण्याचा उपसा होवू नये म्हणून नदी काठच्या विज पुरवठा खंडित करण्यात आला होता. जवळपास आठ ते दहा दिवस झाले दोन तासच जुजबी वीजपुरवठा होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना हानी पोहचली आहे. आधीच उन्हाचा कडाका .. खंडीत विज पुरवठ्याचा धडाका..त्यात पिकांची होवू लागली लाही..लाही . त्यामुळे शेतकऱ्यांची होवू लागली तारांबळ . माणसाबरोबर गुरांचे ही होवू लागले हाल त्यांचेही खंडीत विज पुरवठ्यामुळे होवु लागले पिण्याच्या पाण्याचा व वैरणीचा -हास त्यामुळे खंडीत झालेला विजपुरवठा त्वरित सुरळीत करावा अन्यथा परिणामांना, शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे जावे लागेल.
या पूर्वीच विज वितरण च्या ढिसाळ नियोजनाबद्दल
युवक शेतकरी वर्गानी आंदोलनाचा इशारा ही दिला होता. परंतु महावितरणने त्याकडे डोळेझाक केले होते . त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाने महावितरण ने या पुढे उजनीतुन पिण्यासाठी पाणी सोडल्यास संपूर्ण नदीकाठावरील संपूर्ण गावाचा विज पुरवठा खंडित न करता फक्त नदीकाठाचाच विज पुरवठा कसा थांबवता येईल यावर उपाययोजना, यंत्रणा सक्षम केली पाहिजे. अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे विज वितरण व शेतकऱ्यांचीही खंडीत विज पुरवठ्याच्या त्रासातून सुटका होईल.
0 Comments