LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आंदोलकात आता फुटीचा वास..? चळेत आ. प्रणितीताई शिंदे यांच्या दौऱ्यात स्वागत आणि "गो" बॅक ही

२१/०३/२४

लोकपर्व न्यूज नेटवर्क:- पं ढरपूर  तालुक्यातील चळे येथे लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोलापूर लोकसभेच्या उमेदवार म्हणून आमदार प्रणिती ताई शिंदे यांचे नुकतेच नाव जाहीर झाले होते त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंढरपूर तालुक्यातील काही निवडक गावामध्ये भूमिका जाणून घेण्यासाठी आले असता पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आल्या होत्या त्यानी महादेव मंदिरात छोटेखानी मनोगत ही व्यक्त करून भूमिका ही स्पष्ट केली सध्या मराठा आरक्षण अंशता मागण्या अपूर्ण असल्याने मराठा आंदोलन काही प्रमाणात नाराज असल्याचे दिसले. 

             परंतु या निमित्ताने मराठा आंदोलकाच्या भूमिकेत ठिकठिकाणी द्विपक्षीय भूमिका  दिसून येत होती .   कांहीं मराठा आंदोलकांनी स्वागतही केले ... काहींनी गो बॅक च्याही घोषणा दिल्या तर  आ. प्रणितीताई शिंदे यांनी तुम्ही विरोध करा पण् ज्यांच्या मुळे हा प्रश्न सुटला नाही त्याचाही विचार करा..असे मत व्यक्त करत अप्रत्यक्ष पणे सध्याच्या महायुतीच्या सरकारकडे अंगुलीनिर्देश  करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्याही बाजूला असा प्रश्न उपस्थित होत होता की यापूर्वी आघाडी सरकार दीर्घकाळ होते त्यावेळीही मराठा आरक्षणासंदर्भात ही उपेक्षाच झाली होती असा प्रति सवाल उपस्थित होत होता एक प्रकारे या दौऱ्याच्या वेळेस विविध मतप्रवाहा बरोबरच एकीकडे स्वागत आणि दुसरीकडे 'गो' बॅक अशा दुहेरी भूमिका दिसूण आल्या. 
आ. शिंदे यांच्या समवेत विठ्ठल चेअरमन अभिजीत पाटील, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष रामदास घाडगे, संचालक उमेश मोरे. उपस्थित होते. आबा मोरे, रामदास घाडगे, प्रशांत मोरे, रमेश गायकवाड आदी नी भूमिका विशद केल्या.  या दौऱ्यात स्वागता बरोबर गो बॅक चा ही नारे ऐकू येत होते.

Post a Comment

0 Comments