२० मार्च, २०२४
आमदार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे.
 त्यांनी मतदारसंघात फिरून संकल्प यात्रेद्वारे अंदाज बांधत आहेत, त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी निवडक तालुक्यातील निवडक गावांना भेट दिली मते जाणली  आहेत आहेत परंतु

 कालपर्यंत (१९ मार्च) पर्यंत भारतीय जनता पार्टी उमेदवारा बाबत "तळ्यात- मळ्यात" च होती कालपर्यंत किंवा आज २० मार्च दिवसभर उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे सह प्रा. ज्योती वाघमारे  यांच्या नावाची चर्चा अजून ही होत आहे  परंतु उमेदवारीअधिकृतरित्या जाहीर केलेले नव्हती. 
आधीच मतदार संघात काही अंशी नाराजी मागील दोन्ही वेळचे खासदार अपयशी असल्याचा जनतेतून  चर्चा असूनही सोलापूर लोकसभेचा उमेदवार जिल्ह्यातील नसावा ही गोष्ट कोणाच्या पथ्यावर पडणार..!  हे आगामी काळात सांगणार आहे एकूणत:  "कमळा" बाईच्या ताब्यातील सोलापूर लोकसभा भाजप स्वतःहून विरोधकांच्या "हातात" देत आहे काय...? अशी जनभावना मात्र वाढली आहे.. ,
         सोलापूर लोकसभा मतदारसंघात  बाप...लेकीन काही जुन्या कटु आठवणी सोडून "मिले सूर...मेरा तुम्हारा" तो सूर बने हमारा...!  
          सुशीलकुमार शिंदे व आ. प्रणितीताई शिंदे 
अस म्हणत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना.. मतदारानाही साद घालत आहेत . 
त्यानी पक्षापासून दुरावलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते माजी आ. दिलीप माने, माजी  महापौर  महेश कोठे, तौफिक शेख यांच्या बाबतीत सुधारणा झाली असल्याने निश्चित फायद्याची झुळुक निर्माण झाली. 
पण् राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, कोण रोहीत पवार ... ? या ताई च्या प्रश्नांकित वाक्यावर अजून अडून बसल्याचे दिसून येत आहे.  मात्र खा. शरदचंद्र पवार यांच्या सुचनेनुसार तो अडलेला मार्ग निघू शकतो .
भाजपचा नवा डाव यशस्वी होणार का?  लढतीत हॅट्रीक प्राप्त आ.प्रणिती शिंदे विरूद्ध पद्मश्री मिलिंद कांबळे होणार  का यशस्वी..?
 सोलापूर लोकसभा भाजपचे सध्या चे जवळपास संभाव्य उमेदवार उद्योजक  पद्मश्री मिलिंद कांबळे 
 

0 Comments