कामापूर्वीची विद्युत डेपोची अवस्था
२७ फेब्रुवारी, २०२४
अतुल मोरे/लोकपर्व न्यूज:-
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील महावितरणच्या दृष्टीने व नागरीकांच्या दृष्टीने धोक्याचा बनलेला व अनेक दिवस दुर्लक्षित "लोंबकळणारा" भिजत घोंगडे असलेला चळे येथील स्मशानभूमी नजीकचा वाकलेला विद्युत डेपो, कललेले पोल, आणि हाताला येईपर्यंत लोंबकळणा-या तारा या बाबतचा प्रश्न चळे व पंढरपूर महावितरण कार्यालय विभागाकडून सोडवला असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता स्थानिक महावितरण कार्यालयाने वरीष्ठ पातळीवर दुरुस्ती ची मागणी करुनही साफ दुर्लक्ष केले जात होते टाळाटाळ करुन प्रश्न रेंगाळत ठेवला होता. या परीसरातील सर्व तारा , विद्युत पोल व डेपो यांचा शेतकरी, पशुपालक, सर्व सामान्य ये-जा करणारे नागरिक केंव्हाही धोका पोहचण्याची तीव्रता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकपर्व न्यूज मध्ये महावितरणच्या डोक्यात दुर्घटना घडल्यावरच प्रकाश पडणार काय...? या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेत चळे, पंढरपूर, व वरीष्ठ स्तरावरील महावितरणच्या कार्यालयाने योग्य ती कार्यवाही करत मूळ धोकादायक परिस्थितीची सुधारणा केली.
महावितरण कडून काम चालू असताना चे छायाचित्र
लोंबकळत असणाऱ्या विद्युत तारा सरळ केल्या, कललेले पोलही सरळ केले आणि या सर्वावर कंट्रोल ठेवण्यासाठी आवश्यक असणारा वाकलेल्या विद्युत डेपोही 'सरळ' झाला . त्याला आवश्यक असलेले आधार व ताण जोडल्याने तूर्तास तरी धोका टळला असल्याचे बोलले जात आहे.
लोकपर्व न्यूज चे आभार
"स्थानिक महावितरण कार्यालयाने वरीष्ठ पातळीवर वेळोवेळी सदर कामाच्या दुरूस्तीच्या मागणी साठी प्रयत्न करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु सदर प्रश्ना बाबत लोकपर्व न्यूज ने बातमी द्वारे प्रकाश टाकला असता महावितरणच्या डोक्यात प्रकाश पडला कामाला सुरवात करून संभाव्य धोके कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल चळे नागरीक व स्थानिक महावितरण कडून लोकपर्व न्यूज चे आभार मानले,,
0 Comments