प्रतिनिधी:- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. रोहीत पवार हे दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पंढरपूर येथे आल्यानंतर विठ्ठल मंदिर नामदेव पायरी जवळ राष्ट्रवादी च्या नवीन पक्षाच्या नवीन 'तुतारी' या चिन्हाचे पूजन केल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली होती.
आ. रोहीत पवारांचे "ते" वक्तव्य अंगलट येण्याची चिन्हे...?
या पत्रकार परिषदेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सागर बंगला, भाजप पक्ष यांच्या वर आरोप करताना म्हणाले होते की.
" सागर बंगला हा नेते , आमदार, पक्ष फोडण्याचा केंद्र बिंदू बनला आहे"
असा आरोप आ. पवार यांनी केला होता.
परंतु हाच आरोप त्यांच्या अंगावर, अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण
खा. शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी ही दोन वेळा काँग्रेस फोडली होती..? अनेक राजकीय कुटुंब फोडली.. होती ? असा प्रश्नांकित चर्चित आरोप लोकांमधून होवू लागला आहे.
0 Comments