२९/०२/२०२४
अतुल मोरे/ लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चळे येथे २८ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन व २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एल तांबे, अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक कोडलकर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने आज राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनही लावले होते.वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स तसेच वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञानाचे मॉडेल्स व चंद्रयान - 3 इत्यादी सर्व प्रकारचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या वतीने भरवले होते.
रांगोळीतून रेखाटले चंद्रयान
हे सर्व प्रदर्शन पाहण्यासाठी , माहिती ऐकण्यासाठी चळे येथीलच श्री दर्लिंग विद्या मंदिर व भास्कर अप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय व जि.प. प्राथमिक शाळा चळे शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी गर्दी केली होती.
कार्यक्रम पाहण्यासाठी ऐकण्यासाठी उपस्थित विद्यार्थी, नागरीक.
" हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा.आर.एम बंडगर ,प्रा.जी.पी दांडगे , प्रा. डी.एम.वाघमोडे प्रा. खुणे प्रा.लिंगे प्रा. प्रक्षाळे प्रा. पाटील मॅडम,.प्रा. एडके मॅडम, प्रा. वाघमोडे मॅडम,.प्रा. माळी मॅडम,.प्रा. एस.बी. बनसोडे सर, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले,,
प्राचार्य तांबे , प्राचार्य कोडलकर. सौ पाटील , प्रा. वाघमोडे, श्री अतुल मोरे यांच्या सह सर्वच मान्यवरांनी मराठी भाषेची व विज्ञानाची माहीती सांगीतली.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रमण इफेक्ट चे नोबेल चे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, नाटककार वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले.
डॉ. सी .व्ही. रमण व वि.वा शिरवाडकर यांना वंदन करताना मान्यवर
0 Comments