पंढरपूर प्रतिनिधी:- माघ वारी निमित्त पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार च्या वतीने भरवण्यात आलेल्या खिलार जातीच्या पशु प्रदर्शनात पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील शामराव भीमराव नागटिळक यांच्या गाईची तर , अजनसोंड येथील तुकाराम लक्ष्मण डुबल यांच्या बैलाची "कर्मयोगी चॅम्पियन" म्हणून विशेष निवड झाली.
खिलार जनावर प्रदर्शन संग्रहित छायाचित्र पंढरपूर
वाखरी ता. पंढरपूर येथील पालखी तळावर पंढरपूर कृउबा तर्फे आयोजित खिलार जनावर प्रदर्शनात १६१ जनावरांचा सहभाग झाला होता . त्या पैकी ८१ जनावरांची निवड पशुधन विभागातील पशुवैद्यकीय अधिकि-या मार्फत करण्यात आली होती, विजेत्या स्पर्धकांना माजी आ. प्रशांत परीचारक यांच्या शुभहस्ते प्रशस्ती पत्रक, ट्राफी, रोख रक्कम देवून सन्मानित केले.
अशी माहिती पंढरपूर कृउबा चे सभापती हरीष गायकवाड, उपसभापती राजूबापू गावडे यांनी दिली.
0 Comments