चळे प्रतिनिधी :- पंढरपूर तालुक्यातील चळे येथील वासुदेव भास्करराव गायकवाड यांना पुणे विभागातील महाराष्ट्र शासनाचा 2022 चा सेंद्रिय शेतीचा कृषिभूषण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.वासुदेव गायकवाड हे गेले पंधरा वर्षापासून विषमुक्त शेती करत आहेत विना रसायन विना फवारणी विना खुरपणी या तत्त्वानुसार त्यांचे 30 एकर आंबा व सिताफळ या फळबागांची लागवड आहे. सुरुवातीच्या काळात गायकवाड हे द्राक्ष, डाळिंब ,कलिंगड, टोमॅटो, ऊस, तुरी, अशी पिके पूर्वी रासायनिक पद्धतीने घेत होते.निर्यातक्षम द्राक्षउत्पादन ही घेतले होते.
"श्री वासुदेव गायकवाड यांना राज्य शासनाचा पुणे विभागीय सेंद्रिय शेतीचा उत्कृष्ट सर्वोत्तम शेतकरी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सपत्नीक सत्कार श्री दर्लिंग प्रशालेतर्फे नुकताच करण्यात आला. या वेळी प्राचार्य जे. बी. गायकवाड, उपप्राचार्य टी. एम. भोसले, यांच्या सह सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या वेळी प्रशालेतील दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम ही संपन्न झाला,,
सेंद्रिय शेतीमुळे जीवनमान उंचावते. :- गायकवाड
सेंद्रिय शेती आव्हानात्मक असली तरी युवा शेतक-यानी स्वीकारली पाहिजे , सेंद्रिय शेती मुळे शेतीच्या ओरोग्याचे व माणसाच्या आरोग्याचेही जीवनमान उंचावते , शारिरीक आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी सेंद्रिय शेती महत्वाचा पर्याय म्हणून समोर येत असून ते वास्तविक आहे. असे सांगून नवोदित शेतकऱ्यांना वासुदेव गायकवाड है नेहमी प्रोत्साहन देत असतात. वासुदेव गायकवाड हे कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन हरीष गायकवाड याचे बंधू आहेत. या पूर्वी ही अनेक पुरस्कार त्यांना भेटले असून विविध ठिकाणी शेती विषयक चर्चा सत्रात भाग घेवून मार्गदर्शन ही केले आहे.
0 Comments