प्रतिनिधी
आ. रोहीत पवार यांनी विठ्ठल चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समवेत तुतारी वाजवून निवडणूकीचे रणशिंग फुंकले
"महाराष्ट्रात काल २४ फेब्रुवारी रोजी वेगळीच खळबळ घडली खा. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिल्यानंतर खा. शरद पवार हे रायगडावर जावून एक प्रकारे निवडणूकीचे रणशिंग फुंकले तर आज २५ फेब्रुवारी रोजी त्यांचे नातू आ. रोहीत पवार यांनी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समवेत माढा तालुक्यातील अरण येथील संत सावतामाळी मंदिरात तर पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरा समोर संत नामदेव पायरीजवळ तुतारी या निवडणुक चिन्हाचे पूजन करुन निवडणूकीचे रणशिंग च फुंकले ,,
आ. रोहीत पवार यांनी केले भाजपवर गंभीर आरोप
१. छोटे पक्ष संपवण्याचा भाजपचा इरादा.
२. बारामतीत सुप्रिया सुळेच जिंकणार.
३. एकता समानता संपवली.
४. राणे पिता पुत्र सेलिब्रेटीं नेते.
५. सागर बंगल्याचा वापर नेत्यांना, आमदारांना फोडण्यासाठी,
भ्रष्टाचार नेत्यांना वाचवण्यासाठी.
६. भाजपमधील अनेक नेते नाराज; लोकसभा होवू द्या,
विधानसभेला मजा बघा.
७. अशोक चव्हाणाचा नामोल्लेख टाळून टिका.
८. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक खाती असल्याने
सामान्याकडे दूर्लक्ष
९. चंद्रकांत पाटील महापुरुषांना किंमत देत नाहीत;
ते आपल्या संघर्षाला काय किंमत देणार.
"तुतारी हे चिन्ह सर्व सामान्याना परिचित असणार असून ते लोकप्रिय होवून विजय मिळेल असा आशावाद आ. रोहीत पवार व्यक्त यांनी केला ,,
0 Comments