LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मोहिते- पाटील, शिंदे यांना करीष्मा दाखवावा लागेल अन्यथा....!

 प्रतिनिधी
सध्या सोलापूर लोकसभा व माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी विविध पक्षाकडून अनेकांची चाचपणी सूरु आहे . मतदार संघाच्या व राज्यातील  वेळोवेळी होत असलेल्या राजकीय पुनर्रचनेनंतर अनेक घडामोडी घडल्या आहेत. २००९ नंतर  सोलापूर मतदारसंघ राखीव तर पंढरपूर राखीव ऐवजी 'माढा' मतदार संघ अस्तित्वात येवून तो खुला झाला . या पूर्वीचा सोलापूर जिल्ह्याचा राजकीय नेतृत्वाचा इतिहास पहाता  राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून राहीलेले सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते - पाटील यांची कमांड होती . ते दोघेही काँग्रेसचे असताना व विजयसिंह मोहीते पाटील राष्ट्रवादीचे झाल्यानंतर ही. दोघांचीही मजबूत पकड होती त्यामुळे राज्याच्या इतिहासातील मुख्यमंत्री,  आणि उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्यातील होवू  शकले हा इतिहास पाहता आला. 
माढा लोकसभा मा खासदार व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री 
                   विजयसिंह मोहिते - पाटील 

            मतदार संघ पुनर्रचनेनंतर सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत २००९ ला सुशीलकुमार शिंदे काॅग्रेस, तर २०१४   व २०१९ ला भाजपने खा. शरद  बनसोडे  व खा. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी बाजी मारली. तर माढा लोकसभा मतदारसंघात २००९ ला राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार, तर २०१४ ला मोदी लाट असून ही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी कडून निवडून आले. तर २०१९ ला  कृष्णा - भिमा स्थिरीकरण योजनेवरुन मोहीते - पाटील  यांनी   अकलूज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची सभा घेऊन भाजप  मध्ये प्रवेश केला. व भाजपला माळशिरस तालुक्यातून एक लाखाहून अधिक भाजपला मताधिक्य देण्याचे जाहीर केले . व तो मताधिक्याचा  शब्द पेलूनही दाखवला व मोहीते पाटील यांनीच विद्यमान खा. निंबाळकर यांना भाजपमध्ये आणून उमेदवार म्हणून ही निवडूण आणले. वास्तविक माढा मतदार संघावर मोहिते पाटील यांची असलेली पकड नाकारता येणार नाही कारण माढा लोकसभा मतदारसंघात ते स्वतः अथवा त्यांचा सपोर्ट असलेला उमेदवारच निवडून येवू शकतो हे निश्चित आहे. किंवा त्याना होवू घातलेल्या लोकसभा एप्रिल २०२४ निवडणूकीत करीष्मा अबाधित ठेवून तो दाखवावा लागणार आहे.
      सोलापूरचे माजी खासदार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
                         सुशीलकुमार शिंदे 
        तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांना २०१४ ला मोदी लाट व कमी होत गेलेला संपर्क, आणि २०१९ ला वंचित बहुजन आघाडीने खेचलेली मते , जात फॅक्टर,  अक्कलकोट, दक्षिण सोलापूर , सोलापूर शहर येथून स्वपक्षाचे झालेले कमी मतदान. अनेकांनी सोडलेली साथ. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. त्यांनी कन्या प्रणितीताई शिंदे यांची आमदारकीची हॅट्रीक मिळवली पण खासदारकी गमावली. आता २०२४ मध्ये होवू घातलेल्या खासदारकीच्या निवडणूकीत सुशीलकुमार शिंदे व आ. प्रणितीताई शिंदे यांना करीष्मा दाखवावाच लागणार आहे. स्वतः अथवा समर्थक च खासदार म्हणून निवडून आणावा लागणार आहे..... अन्यथा या पुढील काळात सर्व राजकीय चित्रे वेगळी असणार आहेत.
एकूणच महाराष्ट्रातील सोलापूर हा जिल्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकाच वेळी नेतृत्व केलेला जिल्हा असून माजी  केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी खासदार व उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना अचूक करिश्मा दाखवावाच लागणार आहेत . अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.


 अतुल मोरे - ९८३४७५१९२०


Post a Comment

0 Comments