LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रंगला रामभक्तीचा सोहळा


* वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
-------------------------------------------
चळे प्रतिनिधी :-
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन ग्रामस्थांच्या उदंड प्रतिसादात उत्साहात साजरे झाले.
     प्रारंभी शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास डॉ. सुहास मोरे, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य  प्रा. सुदाम गायकवाड, एलआयसी विकास अधिकारी रणजित जगताप, विठ्ठल चे संचालक उमेश मोरे, सरपंच शालन ज्ञानेश्वर शिखरे, अँड. नंदकुमार सटाले, सिध्दनाथ वाचनालयाचे अध्यक्ष अतुल मोरे, ग्रामपंचायत सदस्य जिल्हा भाजपचे सरचिटणीस (अनुसूचित जाती जमाती) बालाजी वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते निखिल खिलारे, दत्तात्रय माने उपस्थित होते.
     कार्यक्रमाची सुरुवातच प्रभु रामचंद्रच्या  प्राणप्रतिष्ठाण च्या आधारित गाण्याने झाली एकूणच रामभक्तीचा सोहळाच रंगल्याचा भास झाला. मराठी, हिंदी गाण्यांची अविट मैफल रंगली   अधूनमधून विनोदी चुटकुले, इंग्रजी संवाद, राधाकृष्ण आधारित गाणी, मैय्या ये यशोदा ये तेरा कन्हैया या गाण्याने ताल धरायला लावला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रास्ताविक व स्वागत प्रा. विजय गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली चव्हाण, श्रुती चव्हाण, स्नेहल मोरे, दिपाली मोरे, विश्वास वाघमारे, प्रतिक्षा वाघमारे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments