चळे प्रतिनिधी -
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष क्रिडा मार्गदर्शक प्रा. अतुल सटाले यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. राहुल दिगंबर मोरे आणि स्व. गणेश दत्तात्रय मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ८१ पेक्षा अधिक रक्तदात्यानी रक्तदान केले.शिबीराचे उद्घाटन व सत्कार विठ्ठल चे माजी संचालक ज्ञानेश्वर(बापू) गायकवाड, डॉ. सुहास मोरे, संतोष गायकवाड, सरपंच सौ. शालन ज्ञानेश्वर शिखरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय मुख्याध्यापिका कल्पना जगताप-भुसे, ग्रामपंचायत सदस्य चरणदास कोळी, ग्रामसेवक रमेश कोळी , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अतुल मोरे, सज्जन मोरे, प्रताप गायकवाड, महेश मोरे, बालाजी वाघ, माजी अध्यक्ष नेताजी गायकवाड, सहशिक्षिक एकनाथ सुतार, विकास बढे, प्रशांत ठाकरे, सतिश बुवा, आण्णासाहेब रायजादे, स्वाती जाधव- नागणे, सुलभा कुंभार उपस्थित होते शिबीर यशस्वी करण्यासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला पदाधिकारी कर्मचारी, अतुल सटाले मित्र परिवार, स्व. राहुल मोरे, स्व.गणेश मोरे स्नेह परीवारच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
0 Comments