LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वारीत काम करी निरंकारी ; रक्तदान, स्वच्छता, आरोग्य सेवेचा समावेश

दि. ०६/०७/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क 
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, वारकऱ्यांचे स्वागत आणि संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्यांचे  आगमन लक्षात घेऊन संत निरंकारी मंडळाच्या वतीने पंढरपूर येथे व्यापक स्वच्छता अभियान व रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर अशा विविध उपक्रमांचे  आयोजन करण्यात आले असून स्वच्छता मोहीम व रक्तदान शिबीर संपन्न झाले असून आज ४ जुलैपासून आरोग्य तपासणी शिबीराचे प्रारंभ झाला आहे.


 पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, प्रवासी निवासस्थाने, भक्तनिवास, मुख्य रस्ते, स्टेशन रोड, रेल्वे मैदान आणि घनकचरा संकलन केंद्रे यांचा समावेश होता. स्वच्छता मोहिमेत शंभराहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आणि यामध्ये विशेषकरून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहीले. आणि स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधत एक आदर्श सामाजिक जबाबदारी स्विकारली.
 ऐन आषाढी वारीत वारकऱ्यांना रक्ताची कमतरता भासु नये म्हणून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्त संकलनासाठी स्थानिक सरजुबाई बजाज ब्लड बँक व सोलापूर सिव्हील ब्लड बँक रक्तपेढीच्या मदतीने रक्त संकलित करण्यात आले.
याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सोलापूर जिल्हाचे प्रमुख इंद्रपालसिंह नागपाल, सातारा क्षेत्राचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे, बारामती क्षेत्राचे सेवादल क्षेत्रीय संचालक किशोर माने, सोलापूर क्षेत्राचे सेवादल क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार व सोलापूर व बारामती व पंढरपूर  झोनचे सेवादल ९७५ चे  प्रमुखासह संपूर्ण सेवादल महापुरुष व भगिनी या कार्यक्रमात उपस्थित होते.
 दिनांक ४ जुलै ते ६ जुलै या काळात संत निरंकारी मंडळाच्या वतीने मोफत दवाखान्याचे आयोजन केले जाणार असुन वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत, किरकोळ आजारांपासून उपचारांची व्यवस्था येथे केली जाणार आहे. संत निरंकारी मंडळाचे काम अनेक वर्षांपासून चालत आहे "वारीत काम करी निरंकारी" असा प्रत्यय समोर येत आहे. वारकरी मालिकांमधून स्वागत व समाधान व्यक्त होत आहे. 
 
स्वच्छता मोहीम संत निरंकारी मंडळाची 


Post a Comment

0 Comments