LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विविध मागण्यासाठी "खळ्ळ- खट्याळ" आंदोलनाचा इशारा..! पंचनामे करा.. पिक कर्जासाठी सि- बिल अट रद्द करण्याच्या मागणीचा समावेश

दि. २२/०५/२०२५
लोकपर्व न्युज नेटवर्क 
फोटो ओळी : मा. तहसीलदार पंढरपूर यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी 

सध्या मान्सून पूर्व पाऊस सर्वत्र धुमाकुळ घालत आहे अनेक ठीकाणी वळवाचा पडलेल्या पावसाने थैमान घातले असून शेतक-याना लाभदायक ठरण्या ऐवजी हानीकारक ठरला आहे . त्या पाश्वभूमिवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसान झालेल्या भागाचे त्वरीत पंचनामे करावेत अशी मागणी पंढरपूर तहसीलदार यांच्या कडे केली आहे.  
त्याचबरोबर  सध्या याच पडलेल्या पावसामुळे शेती मशागतीचे कामे ऐरणीवर आली आहेत त्यात बॅका पिक कर्जासाठी  सि बिल स्कोअरच्या आडून काही बॅका काही शेतक-याची आडवंणूक करत आहेत . मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी  बँकांनी पिक कर्जाचा कोटा पूर्ण करावा. सि बिल चार अडथळा आणू नका असा स्पष्ट आदेश असताना जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत हे त्वरीत थांबवा अन्यथा खळ्ळ - खट्याक सारखे उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे पाटील  व शेतकरी पदाधिकारी यांनी दिला. या वेळी सचिन अटकळे, महादेव शिंदे,  चद्रकात सावंत , सुधीर लिगाडे, विकास जाधव उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments