LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

माढ्यातून अभीजीत पाटील, मोहोळ मधून राजू खरे, पंढरपूरातून अनिल सावंत यांनीच हातात घेतली "तुतारी", उमेदवार बदलीचा आज अखेचा दिवस ,लढतीचे अंतिम चित्र ४ नोव्हेंबर स्पष्ट होणार..!

दि. २९/१०/२४

लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
विधानसभा निवडणूक झाल्यापासून किंवा त्याही अगोदर पासून सोलापूर जिल्ह्यातील माढा, पंढरपूर- मंगळवेढा, मोहोळ हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ अतिशय चर्चेत आले होते चर्चेत राहिले आणि निकाल लागेपर्यंत ही चर्चेत राहणार आहेत.
 आज २९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेले अनेक जण एबी फॉर्म पासून वंचित असलेले अनेक उमेदवार साठी आजचा शेवटचा दिवस मानला जात आहे त्यातच उमेदवारीच्या आदलाबदलीसाठी संपूर्ण राज्यात ही मोठ्या प्रमाणात धावपळ उडणार आहे.
                 २७ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी व महायुतीकडून अनेक उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु २८ ऑक्टोबर  सायंकाळपर्यंत अनेक बदल घडून आले. त्यात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु पुन्हा लगेच राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाकडून अनिल सावंत यांनी २८ रोजी अर्ज दाखल केला.
 त्याचबरोबर बहु चर्चेत मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून अनपेक्षित पणे सिद्धी रमेश कदम यांचे तुतारीसाठी नाव अग्रेसर ठरवून जाहीर केले होते.
 परंतु २८ ऑक्टोबर रोजी अत्यंत शेवटच्या क्षणी "राजू खरे" यांनी आपला सुरुवातीपासूनच असलेला लढण्याचा बाणा कायम ठेवत तुतारी हातात घेऊन रणशिंग फुंकले.  
           तर माढा विधानसभा मतदारसंघातून दोन विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनच्या तुतारी उमेदवारी मिळण्याच्या लढाईत पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
        आता त्यांच्या विरोधात माढा तालुक्यातून पंढरपूर तालुक्यातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातून नेमके कोण उभे राहणार याची पुस्तक आज सायंकाळपर्यंत निश्चित उत्तर मिळणार सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माढ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य 
शिवाजी कांबळे माजी नगराध्यक्षा मीनल साठे तर सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते.



Post a Comment

0 Comments