लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ कोण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहे, कोण कुणाकडे मागणी करत आहे याची विविध खुमासदार चर्चा घडत असतानाच या मतदारसंघातून भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचे नाव चर्चेत आघाडीवर असता त्यानी त्या बाबतीत खुलासा करताना विविध बाबी स्पष्ट केल्या.
* मी उमेदवार म्हणून तुतारी राष्ट्रवादी कडून इच्छुक असल्याचे खा. शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन कळवले आहे. भेट घेण्याचा हा निर्णय माझा वैयक्तिक आहे.
* मी हा घेतलेला निर्णय काका आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत ( शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गट) यांना माहीत नाही
* महाविकास आघाडी कडून तिकीट दिल्यास मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लढवणार
* सध्या काका डॉ. तानाजी सावंत यांचे व माझे काम करण्याचे कार्यक्षेत्र वेगळे आहे .
* मी निवडणूक लढवण्याची वेळ आल्यास अंतिम निर्णय काका डॉक्टर तानाजी सावंत यांना विचारून निर्णय घेणार असे स्पष्ट केले.
* अंतिम पुढील राजकीय निर्णय काकांच्या असल्याने घेणार असल्याने काका व पुतण्या हा राज्यातील वलंयंकित झालेला असा कोणताच वाद नसल्याचा स्पष्ट केले
0 Comments