LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळेच्या मुख्याध्यापिका आदर्श पुरस्काराने सन्मानित ; राष्ट्रवादी SP शिक्षक सेल पंढरपूर तालुका पुरस्काराचे वितरण

०५/०२/२०२४

अतुल मोरे/लोकपर्व न्यूज :- 
पं ढरपूर तालुका  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्य शिक्षक सेल च्या वतीने जाहीर केलेले आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात जिल्हा अध्यक्ष बळीराम  काका साठे यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाले. 
          आदर्श मुख्याध्यापिका म्हणून चळे ता. पंढरपूर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना कृष्णदेव भुसे यांना प्राप्त झाला.
 
        हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्यासह 
            पंढरपूर तालुक्यातील विष्णुपंत मनोहर गावडे ( तावशी), शिवाजी बाबा पाटील (रोपळे), नागनाथ गायकवाड, क्रिडा शिक्षक विठ्ठल उपाडे, कृतिशील शिक्षिका स्मिता अटकळे, अनिल गणपत पवार,  प्रा. सुशील शिंदे, लेखक अंकुश गाजरे,  पत्रकार सिध्दार्थ ढवळे,  शिक्षकेतर कर्मचारी उत्तम दगडू फडतरे यांना सन्मानित करण्यात आले.
      या कार्यक्रमास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) शिक्षक  सेल राज्य संघटक साहेबराव भुसे, निरीक्षक शेखर माने, शिक्षक सेल प्रदेशाध्यक्ष दिलीप सोनवणे, नागेश फाटे आदी सह विविध संस्थांचे पदाधिकारी , शिक्षक मोठ्या  संख्येने उपस्थित होते.,
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पंढरपूर तालुक्याच्या वतीने आदर्श पुरस्कार सन्मानित 
  " हे पुरस्कार शैक्षणिक , सामाजिक, व समाजामध्ये जनजागृतीचे कार्य करणाऱ्या कला, क्रिडा, लेखक, कृतिशील शिक्षक ( प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक)  इत्यादी स्तरातून दिला जात असून. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे,,

Post a Comment

0 Comments