LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून नविन तीन उमेदवाराची संभाव्य यादीत भर..!

 भाजप व काँग्रेसला समान संधी 
विशेष प्रतिनिधी :-
    सोलापूर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून अनेक संभाव्य उमेदवाराची ग्राउंड चाचपणी केली जात आहे काहींची पूर्ण झालेली आहे.
                   माजी.खा. अमर साबळे 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मला भाजपकडून पक्ष  प्रवेशाची ऑफर आली होती असा गौप्यस्फोट करुन सोलापूरचे राजकीय वातावरण तापवले होते  त्यातच काँग्रेस च्या संभाव्य उमेदवार गणल्या जाणाऱ्या आ. प्रणिती शिंदे यांनी " राजकीय सुरवात काँग्रेस व शेवट काँग्रेस मध्येच" होईल म्हणून खळबळ उडवून दिली. तर भाजप कडून कोणतीच ऑफर दिली नसल्याचे कांहीं  जाहीर केले हे सर्वश्रुत झाले आहे. अशातच भाजपकडून अतिशय सावध पावले उचलली जात आहेत.
          आमदार विजयकुमार देशमुख
 २०१४  साली मोदी लाटेचा करिश्मा दिसून आला. नवखे असलेले सिने अभिनेते अँड.शरद बनसोडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर २०१९ मध्ये डॉ. जय सिध्देश्वर महास्वामी हे जात फॅक्टर, त्यांच्यावर असलेली श्रद्धा, आणि वंचित बहुजन आघाडी चे प्रकाश आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात खेचलेली मते ही काँग्रेस च्या पराभवास व भाजपच्या विजयास कारणीभूत ठरले होते. 
सध्या परिस्थितीत बदल झाला आहे. वंचित आघाडी महाविकास आघाडीत सामील झाली आहे. दोन्ही खासदारकीच्या टर्म भाजपच्या कांहीं अंशी नाराजी वाढवणा-या ठरल्याच्या चर्चा आहेत. त्याचा काँग्रेस ने पुरेपुर फायदा उठवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे भाजपकडून नवनवीन उमेदवाराची चाचपणी चालू केल्याचे दिसत आहे.



 

या पूर्वी भाजपकडून प्रा. चांगदेव कांबळे, आ. राम सातपुते, माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, कोमलताई ढोबळे यांची चर्चा होती.  त्यात भाजपकडून आणखी तीन नावांची भर पडली आहे. 
आ. विजयकुमार देशमुख, माजी राज्यसभा खा. अमर साबळे, पंढरपूर लोकसभा लढवलेले नागनाथ क्षीरसागर यांच्या नावाचा संभाव्य उमेदवार म्हणून गणना होवू लागली आहे.
         उमेदवारीची मागणी केलेले नागनाथ क्षीरसागर 
 

Post a Comment

0 Comments