-----------------------------------------------------
विशेष प्रतिनिधी
समाजातील चांगुलपणा शोधण्याबरोबरच चुकीच्या गोष्टींना पायबंद बसवून समाजासाठी प्रामाणिकपणे झिजणा-या, समाज सुधारणेसाठी कष्ट उपसणा-या व्यक्तीचा गौरव झाला पाहिजे असे मत रयत शिक्षण संस्था सातारा चे जनरल बाॅडी सदस्य डॉ. राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. ते मंगळवेढा येथे झेप सामाजिक संस्था आयोजित विविध पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परीवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे हे होते.
व्यासपीठावर छत्रपती परीवाराचे श्री सुरेश पवार, ज्ञानदीप संकुलाचे प्रमुख संभाजी सलगर, डॉ. ममता रजपूत, समन्वयक राहुल रजपूत, आदी मान्यवर उपस्थितीत होते. या वेळी सुरेश पवार यांनी आपल्या मनोगतात सर्वच सन्मानित करण्यात येणाऱ्या व्यक्तींचा कर्तृत्वाचा गुण गौरव करून सन्मान सोहळ्यात सन्मानित व्यक्तींची उंची वाढवली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी अनेक इतर महत्त्वाचे कार्यक्रम डावलून या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याचे नमूद करुन झेप सारख्या संस्था मुळे निश्चित काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळेल असा आशावाद व्यक्त केला . झेप सन्मान सोहळ्यातील "लालसिंग रजपूत व्यक्ती नव्हे चळवळ" हा मानाचा पुरस्कार सिद्राम यादव गुरुजी यांना देवून गौरविण्यात आले.
* झेप संस्थेचे पुरस्कार प्राप्त संस्था व व्यक्ती:-
______________________________________
१) आदर्श संस्था - श्री संत चोखोबा शिक्षण संस्था हून्नूर.
२) आदर्श शाळा-श्री सिध्दनाथ विद्यालय, लेंडवे चिंचाळे.
३) हिरकणी पुरस्कार - परिणिता दगडू फटे.
४) पत्रकारिता - मल्लिकार्जुन देशमुखे.
५) आदर्श शिक्षक - शिवकुमार सिद्रमय्या स्वामी.
६) आदर्श शिक्षिका - सुवर्णा महादेव साळुंखे -डोके.
७) सेवावृत्ती पुरस्कार - दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर.
८) उत्कृष्ट निवेदक - प्रा. स्मिता प्रविण जडे.
९) युवा मित्र - राकेश गायकवाड, मंगळवेढा
( संजय - सविता स्मृती वाचनालय)
१०) शिक्षकेतर कर्मचारी - पुष्पांजली सुर्यकांत सोनवले.
_____________________________________
विशेष सत्कार:- प्रा. प्रकाश जडे, पत्रकार दिगंबर भंगरे, प्रा.अमोल नष्टे यांचा करण्यात आला.
________________________________________
प्रास्ताविक समन्वयक राहुल रजपूत, सुत्रसंचलन भारती धनवे, आभार संचालक प्रा. संतोष आसबे यांनी मानले.यावेळी भारत घुले, संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत मेलगे, प्रा. बसवराज पाटील, प्रा. मल्लेशा अरकेरी, बाळासाहेब जावळे, बापू मासाळ, रमेश माने, आश्विनी मेलगे, उपस्थित होते.
* झेप सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. राजेंद्र जाधव,
0 Comments